बारामती – प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबाबत केलेल्या वक्तव्या वरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी इंदुरीकर यांच्या वक्तव्याबाबत त्यांची समजूत काढणार असल्याचे सांगितले आहे. ते बारामतीत आल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
त्यांच्या स्टाईल मध्ये केलेल्या प्रबोधनातून समाजामध्ये जागृती होते त्यामुळे त्यांच्या कीर्तना मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. गेल्या दोन वर्षांपासून कीर्तन आणि प्रबोधन बंद असताना त्यांचा समाजातील जास्त संपर्क आला नाही. जागतिक स्तरावर लसीकरणाचे महत्त्व सगळ्यांनी जाणलं आहे.
महाराजांचा अध्यात्मिक अभ्यास जास्त आहे. मात्र, वैज्ञानिक बाजू देखील समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.