ईडी आता पान, तंबाखुच्या दुकानासारखी झालीय – आमदार प्रणिती शिंदे

सोलापुर – ईडी सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा विरोधकांच्या मागे लाऊन विरोधकांवर दहशत माजवण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. पण ईडी आता पान, तंबाखुच्या दुकानासारखी झाली आहे, मी केंद्र सरकारच्या विरोधात बोलत आहे म्हणून उद्या माझ्याही मागे ही यंत्रणा लागेल, अशी टोलेबाजी कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

कोणाच्याही घरी हे लोक जातात आणि ते कोणालाही उचलून आणतात. ईडी ही आता सवंग यंत्रणा झाली असून त्याचा केवळ राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आज सोलापुरात बोलताना त्या म्हणाल्या की, आज कोणत्याही निर्दोष व्यक्तीला तुरूंगात डांबले जात आहे. मोदी सरकारकडून लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण ज्यांनी शेतकऱ्यांना चिरडून मारले ते लोक मात्र खुलेपणाने िंहंडत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.