मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील अनेक महत्वाची मुद्यांवर चर्चा करण्यात आली. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने आठ निर्णय घेतले आहेत. वित्त विभाग, सामाजिक न्याय, सहकार व वस्त्रोद्योग, ऊर्जा विभाग, कामगार विभागाशी संबंधित निर्णय घेण्यात आले आहेत.
आजच्या बैठकीतील राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय
– महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार.
– महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार.
– राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार.
– कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता.
✅ महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार.
✅ महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार.
✅ राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 19, 2023
– इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार.
– बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण.
– राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करणार.
– अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय.