नवी दिल्ली – हाथरस घटनेचे वार्तांकन करण्यासाठी केरलमधून आलेल्या आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ददेशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केलेला पत्रकार सिद्दीक कप्पन याला मिळणाऱ्या अमानवी वर्तणुकीचा एडिटर्स गिल्डने निषेध करून त्याला योग्य ती वैद्यकीय मदत देत त्याला सन्मान पूर्वक वागवावे, अशी मागणी केली.
सर्वोच्च न्यायालयाने सिद्दीक यांची प्रलंबित याचिकेवर तातडीने सुनावणी घेऊन त्याची निष्पक्ष सूनावणी घेण्याची मागणीही केली.
सिद्दीक हा ऑक्टोबर 2020 पासून पोलीस कोठडीत आहे., त्याला मिळणाऱ्या अमानवी वागणुकीच्या बातम्यांमुळे अत्यंत व्यथित आहोत. त्यांना बेडला बांशुं ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. मथुरा करोना रुग्णालयात तो अन्न घेऊ शकत नाही की शौचास जाऊ शकत नाही, असेही त्याच्या पत्नीने म्हटले आहे.
ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. एखाद्या पत्रकाराला अशी क्रूर वागणूक देणे आणि त्याचे मूलभूत हक्क नाकारणे अशोभनीय आहे.
त्यांच्या कुटूंबियांच्या आणि सामाजिक संस्थांच्या मागणीकडे उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री दुर्लक्ष करत आहेत. सर्वोच्च न्यायालयही त्यात हस्तक्षेप करत नाही. हे आणखी धक्कादायक असल्याचे गिल्ड ने निवेदनात म्हटले आहे.