भारतीय राजकारणातील कर्तृत्व, नेतृत्व आणि ग्लॅमरही!

नवी दिल्ली – भारताने सौंदर्य आणि ग्लॅमरच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण केली आहे. अनेकजणींनी मिस्‌ वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स यासह अऩेक सौंदर्य किताब जिंकले आहेत. भारतीय महिलांचे कर्तृत्व केवळ सौंदर्य किताबांपुरतेच मर्यादित नसून त्या राजकारणासह
विविध क्षेत्रांमध्ये चांगल्या प्रकारे योगदान देत आहेत. अशा महिलांविषयी.

नुसरत जहॉं:
नुसरत जहॉं अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री आणि खासदार आहे. बंगाली सिनेसृष्टीत
त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 8 जानेवारी 1990 ला त्यांचा जन्म कोलकत्यात
झाला. 2019 मध्ये त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला आणि तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवार
म्हणून बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या. 2011 मध्ये
त्यांनी राज चक्रवर्ती यांच्या चित्रपटातून पदार्पण केले होते. 2019 मध्ये उद्योगपती निखिल
जैन यांच्याबरोबर त्यांनी विवाह केला.

दिव्या स्पंदना:
अतिशय सुंदर असणाऱ्या दिव्या स्पंदनाला चित्रपटसृष्टीत राम्या नावाने ओळखले जाते. दक्षिण
भारतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. कन्नड चित्रपटांबरोबर तमीळ
आणि तेलगू भाषांमधील चित्रपटातही तिने काम केले आहे. तिचा जन्म 29 नोव्हेंबर 1982
रोजी बंगळुरूमध्ये झाला. तिचा पहिला चित्रपट कन्नड भाषेतील मुसन्जईमातु हा होता. तो
2008 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट सुपरहिट झाला. राम्याने 2013 मध्ये कॉंग्रेसची सदस्य
म्हणून कर्नाटकातील मंड्या मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकून राजकारणात पदार्पण केले.

अलका लांबा:
अलका लांबा यांची अतिशय आक्रमक नेत्या म्हणून ओळख आहे. केवळ 19
व्या वर्षी त्यांनी कॉंग्रेसची विद्यार्थी आघाडी असलेल्या नॅशनल स्टुडंटस्‌ युनियन ऑफ इंडियाचे
(एनएसयूआय) काम करणे सुरु केले. युवकांना सामर्थ्यशाली बनवण्यासाठी त्यांनी गो इंडिया
फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. कॉंग्रेसमध्ये वीस वर्षांहून अधिक काळ काम
केल्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आणि फेब्रुवारी 2015 मध्ये झालेल्या दिल्ली
विधानसभेच्या निवडणुकीत चांदणी चौक मतदारसंघातून विजयी झाल्या.

अंगूरलता डेका:
अंगूरलता डेका मॉडेल आणि अभिनेत्री असण्याबरोबरच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी
आहेत तिने मुख्यतः बंगाली आणि आसामी चित्रपटात काम केले आहे. त्याचबरोबर चित्रपट
दिग्दर्शनही करतात. त्या 2016 मध्ये आसाममधील बतद्रोबा मतदारसंघातून आमदार म्हणून
निवडून आल्या आहेत.

डिंपल यादव
अतिशय सौम्य स्वभावाच्या आणि नेहमी साडी परिधान करणाऱ्या डिंपल यादव या सुंदर आणि
ग्लॅमरस नेत्या म्हणून ओळखल्या जातात. उत्तर प्रदेशातील कन्नोज मतदारसंघातून त्या दोन
वेळा समाजवादी पक्षाच्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांचे पती अखिलेश यादव
आणि सासरे मुलायमसिंह यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

गुल पनाग
गुल पनाग ही एकेकाळची ब्युटी क्वीन आणि अभिनेत्री आहे. धूप चित्रपटाद्वारे तिने 2003 मध्ये
चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने अनेक चित्रपटांमध्ये आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले
आहे. 2014 मध्ये आम आदमी पक्षाची उमेदवार म्हणून तिने चंदीगढ लोकसभा मतदारसंघातून
निवडणूक लढवली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.