मुंबई – गेल्याअनेक दिवसांपासून शिवसेनेतील अनेक नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमकतेने विविध आरोप करताहेत. अशातच काल किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ शेअर करत नवीन वर्षाचा एक संकल्प केला होता. ते विडिओ मध्ये म्हणाले होते की नव वर्षातील आपले नवे निशाणे जाहीर केले होते. यात त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील नेत्यांची नावं जाहीर केली होती.
उद्या पासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात
ठाकरे परिवाराचे १९ बंगले
अनिल परब
हसन मुश्रीफ
असलम खान चे स्टुडिओ
किशोरी पेडणेकर एस आर ए सदनिका
मुंबई महापालिका
यांचा घोटाळ्यांचे हिशोब पूर्ण करणार @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/DLR2ie7z1g
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 31, 2022
त्यानुसार आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला 19 बंगल्यांच्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या रश्मी ठाकरे यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या रेवदंडा पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.