Lok Sabha Result 2024 (Mumbai South Central) : दक्षिण-मध्य मुंबईत शिंदे गटाला मोठा धक्का; शिवसेना ठाकरे गटाच्या अनिल देसाईंनी मारली विजयी…

Mumbai South Central Lok Sabha Result 2024 : मुंबईच्या 6 प्रमुख जागांपैकी मुंबई दक्षिण मध्य ही जागा महत्त्वाची होती. अनिल देसाई या जागेवरून शिवसेनेकडून (यूबीटी) निवडणूक लढवत होते, तर शिंदे गटाने राहुल शेवाळे यांना उमेदवारी दिली होती. मात्र या जागेवरून राहुल शेवाळे यांना अनिल देसाई यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी दक्षिण मध्य मुंबईतून विजय संपादन केलाय. त्यांना शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचं आव्हान होत. अनिल देसाई यांना 3 लाख 95 हजार 138 मते मिळाली आहेत. त्याचवेळी राहुल शेवाळे यांना 3 लाख 41 हजार 754 मते मिळाली आहेत. अनिल देसाई यांनी तब्बल 53 हजार 3384 मतांनी राहुल शेवाळे यांचा पराभव झाला आहे.
#WATCH | Shiv Sena (UBT) leader Anil Desai says, “…It’s a win for the leadership and party workers of the parties in the INDIA alliance. It’s needed to be strong in democracy…” pic.twitter.com/vTYRXGj5Xo
— ANI (@ANI) June 4, 2024
अनिल देसाई यांनी मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील विजय हा जनतेचा विजय असल्याचे म्हटले आहे.




