नवी दिल्ली – बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती आहे. बँक ऑफ बडोदाच्या आयएफएससी कोड मध्ये बदल झाले आहे. या बॅंकेच्या ग्राहकांना आता जुना आयएफएससी कोड येत्या 1 जुलै पासून वापरता येणार नाही. त्यासाठी बॅंकेकडून नवीन आयएफएससी कोड देण्यात आला आहे. 2019 मध्ये बॅक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे आयएफएससी कोड मध्ये बदल करण्यात आला आहे.
विजया बँक आणि देना बँकेचं विलिनीकरणार बँक ऑफ बडोदामध्ये झाले होते, ज्यानंतर या कोडमध्ये बदल करण्यात आले होते. मात्र बॅंकेकडून जुना आयएफएससी कोड वापरण्यासाठी 30 जून पर्यंत सवलत देण्यात आली होती. त्यामुळे येत्या 1 जुलैपासून हे जुने आयएफएससी कोड काम करणार नाहीत.
नवीन आयएफएससी कोड माहिती करुन घेण्यासाठी ब्रँचमध्ये जाऊन नवीन IFSC Code माहित करू शकता अन्यथा बँकेकडून पाठवण्यात आलेले लेटर किंवा एसएमएसच्या माध्यमातून देखील तुम्ही नवीन कोड माहित करून घेऊ शकता. याशिवाय बॅंकेंचा टोल फ्री क्रमांक 18002584455/18001024455 यावर देखील कॉल करून माहित करून घेऊ शकता.
SMS च्या माध्यमातून देखील नवीन आयएफसी कोडबाबत माहिती करून घेऊ शकता. SMS च्या माध्यमातून IFSC Code मिळविण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुन MIGR <Space> अकाउंट नंबरचे शेवटचे चार अंक 8422009988 या क्रमांकावर पाठवावे लागतील. त्यानंतर बॅंकेंकडून एसएमएसच्या माध्यमातून आयएफएससी कोड देण्यात येईल. याशिवाय बँक ऑफ बडोदाची अधिकृत वेबसाईट् https://www.bankofbaroda.in/amalgamation-migration.html या ऑफिशिअल लिंकच्या माध्यमातून आयएफएससी कोडबाबत माहित करून घेऊ शकता.