पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. पक्षाच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांना भाजपशी युती करणार का? असं विचरलं असतात ते म्हणाले,
“फक्त भेट झाली म्हणजे युती होत नाही. तर हे यांना भेटले म्हणजे लगेच युती होते का? आता मी बाळासाहेबांच्या एका पुस्तकांच्या प्रकाशनाला गेलो होतो. तिथं शरद पवार होते. म्हणजे काय युती झाली का?’ असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी पत्रकारांना केला.
दरम्यान, आता राज ठाकरेंच्या या टीकेला भाजप नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी, “राज ठाकरे यांना युतीसाठी भाजपने कधी बोलावलचं नाही असं म्हटलं आहे. तर आम्ही काही घेण्यासाठी दरवाजे उघडे ठेवलेत का?
असा खोचक सवाल राज ठाकरे यांना केला आहे. ते येणार नाही हा आनंद आहे आणि ते आयुष्यभर येऊ नयेत अशी सदिच्छा ही असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मात्र, आता मुनगंटीवार यांच्या टीकेला मनसे नेते कश्या पद्धतीने प्रतिउत्तर देताय हे देखील पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे.