नवी दिल्ली – छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेप्रकरणी दिल्लीतील विशेष न्यायालयाने माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांना चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा आणि मेसर्स जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जैस्वाल यांनाही चार वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन वरिष्ठ नागरी सेवक केएस क्रोफा आणि केसी समरिया यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
यापूर्वी 13 जुलै रोजी न्यायालयाने माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता यांच्यासह अन्य पाच आरोपींना दोषी ठरवले होते.
Delhi’s Special Court sentences 4 years imprisonment to former Rajya Sabha MP Vijay Darda. His son Devender Darda, M/S JLD Yavatmal Energy Pvt Ltd’s Director Manoj Kumar Jayaswal also sentenced to four years imprisonment in a case relating to irregularities in the allocation of a… pic.twitter.com/An6uzLPVow
— ANI (@ANI) July 26, 2023
विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी कोळसा खाण वाटप प्रकरणात माजी खासदार पुत्र देवेंद्र दर्डा, ज्येष्ठ लोकसेवक केएस क्रोफा आणि केसी समरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही दोषी ठरवले. सीबीआयने या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला असला तरी 2014 मध्ये कोर्टाने तो स्वीकारण्यास नकार दिला आणि तपास एजन्सीद्वारे नव्याने चौकशी करण्याचे निर्देश दिले.