मुंबई – बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता या इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बोस्टनमध्ये २ पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांच्या ‘द लास्ट कलर’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
‘द लास्ट कलर’ या चित्रपटाची ‘सर्वोत्कृष्ट फिचर’ या श्रेणीमध्ये निवड झाली होती. नीना गुप्ता यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबद्दल माहिती दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास खन्ना यांनी केले होते या चित्रपटाची कथा वृंदावन आणि वाराणसीमधील विधवा महिलांवर आधारित होती.
View this post on Instagram
Phoolon ke rang se… #TheLastColor Coming soon to India! @vikaskhannagroup
या चित्रपटाचा पहिला लूक ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’, ‘न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल’ आणि ‘इंडी मेमे फिल्म फेस्टिव्हल’मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.