तमिळमधीत सुपरस्टार नयनतारा शाहरुख खानबरोबरच्या सिनेमातून हिंदीमध्ये पदार्पण करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तमिळमधील प्रसिद्ध डायरेक्टर ऍटली हे या सिनेमाचे डायरेक्शन करणार असल्याचे समजते आहे.
त्यांचा हा पहिलाच हिंदी सिनेमा असणार आहे. “सनकी’ असे या सिनेमाचे शीर्षक असणार आहे. डायरेक्टर आणि हिरोईन जरी तमिळ असले तरी हा सिनेमा कोणत्याही तमिळ सिनेमाचा रिमेक असणार नाही. तर हा एक पूर्ण नव्या कथेवरील हिंदी सिनेमा असणार आहे.
नयनतारा ही तमिळमधील केवळ सुपरस्टार नाही तर ती शाहरुखबरोबर, ऍटली यांच्याबरोबरचा तिचा एकत्र काम करण्याचा तिचा पहिलाच अनुभव असणार आहे. मात्र, तिला अद्याप या सिनेमातील रोलबद्दल पुरेसा आत्मविश्वास वाटत नाही.
म्हणूनच तिने अद्याप या सिनेमाला होकार दिलेला नाही. बॉलीवूडमध्ये उडी घेण्याची घाई करायची नाही असे तिने ठरवले आहे. तिला बॉलीवूडमध्ये उतरायचे आहे. पण रोलबाबत तिला पूर्ण खात्री पटली पाहिजे. ऍटली सध्या या सिनेमाच्या स्क्रिप्ट लिहीत आहे. त्यानंतर आपल्या भूमिकेला योग्य न्याय मिळतो आहे अशी खात्री पटल्यानंतरच ती होकार कळवणार आहे.