कराड, (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने देशाला बळकटी देणारे गौरवशाली नेतृत्व लाभले आहे, असे मत भाजपचे सातारा लोकसभा मतदारसंघ प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केले.
राज्य शासनाच्या 25/15 ग्रामविकास योजनेतून मिळालेल्या दहा लाख रुपयांच्या निधीतून येरवळे, ता. कराड येथे होणार्या विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
कृष्णा कारखान्याचे संचालक सयाजी यादव, पंचायत समितीच्या माजी सदस्या नंदा यादव, सरपंच रूपाली यादव, माजी सरपंच गीतांजली यादव, सोसायटीचे संचालक बाबासाहेब यादव, वसंत यादव, रामभाऊ लोकरे, काजल चव्हाण, कविता यादव, सुवर्णा यादव, सुनील यादव, डॉ. आनंदराव लोकरे, कैलास यादव, भरत यादव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. भोसले म्हणाले, नरेंद्र मोदींच्या रूपाने दूरदृष्टी असलेले नेतृत्व देशाला लाभले आहे. त्यांनी देशातील सामाजिक सलोखा टिकवताना, विकास गतिमान केला आहे.
अनेक योजनांमधून जनतेची उन्नती साधण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघात भरघोस निधी मिळत आहे. भविष्यातही निधी मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.