जामखेड – चार राज्यातील निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी तीन राज्यात भाजपला विजय मिळाल्याने जामखेड भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरात आनंदाचा जल्लोष फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरा करण्यात आला.
यावेळी सभापती कार्ले म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज तीन राज्यांमध्ये सत्ता आल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे .
“ये तो ट्रेलर है ,पिक्चर अभी बाकी है. या निवडणूक प्रचारात आमचे नेते आमदार राम शिंदे यांचाही खारीचा वाटा आहे, असा विश्वास व्यक्त केला. आण्णा ढवळे म्हणाले की, येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी नगरसेवक भाजपा शहराध्यक्ष बिभिषण धनवडे, सभापती शरद कार्ले, पोपट राळेभात, प्रा. संजय राऊत, गोरख धनवट, अनिल यादव, युवा नेते आण्णासाहेब ढवळे, प्रविण बोलभट, विष्णू गंभिरे, उद्धव हुलगुंडे, डॉ. विठ्ठल राळेभात, आमदार शिंदे युवा मंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पांडुरंग माने, शहर उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे, दादा महारनवर, विलास मोरे, भैय्या पवार, राजू शिंगणे, तुषार बोथरा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.