बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने आपल्या हॉट अदांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. “मर्डर’ चित्रपटातून ती रातोरात सुपरस्टार बनली. या चित्रपटाला आता जवळपास 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, इतक्या वर्षांनंतर अभिनेत्रीने चित्रपटात दिलेल्या बोल्ड दृश्यांविषयी आपले मत व्यक्त केले आहे.
अलीकडेच अभिनेत्रीने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, मर्डर फिल्म केल्यावर मला लोकांमध्ये एक खालच्या दर्जाची महिला म्हणून पाहिले गेले होते. जर आज मी या चित्रपटांबद्दल विचार केला तर, आता हे सगळं सामान्य झालं आहे.
मात्र, त्यावेळी नव्हतं. कदाचित याचमुळे आता लोकांचा या चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आता सिनेमा काळाबरोबर बदलत चालला आहे. सर्व प्रकारचे चित्रपट लोक पाहतात आणि पसंतदेखील करतात, असे तिने सांगितले.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास मल्लिका “प्यार के साईड इफेक्ट्स’, “आप का सुरूर’, “वेलकम’ आणि “डबल धमाल’ या चित्रपटांमध्ये झळकली होती. 2019 मध्ये मल्लिकाने “बू सबकी फाटेगी’ वेबसिरीजद्वारे डिजिटल विश्वात पदार्पण केले.