बारामती – संपात सहभागी असलेल्या 13 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आहे. बारामती आगारातील 7 तर एमायडीसी आगारातील 6 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी दिली आहे. विविध मागण्यांसह एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेले काही दिवसांपासून सुरू आहे. दिवसेंदिवस त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती स्थापन केली आहे. समितीच्या निर्णयाचा अहवाल चार आठवड्यात न्यायालयात सादर करावा लागणार आहे. तोपर्यंत आमची संपावर बसण्याची तयारीआहे, अशी माहिती बारामती आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी दिली.