कोल्हापूर – कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी ६ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. संप मागे घेण्याचे आवाहन करूनही आंदोलक ठाम राहिल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. याचा भाग म्हणून कोल्हापूर विभागातील आठ आगारातील ३८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर आगारातील संघटनेचे अध्यक्ष उत्तम पाटील यांच्यासह ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
या कारवाईत मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर, इचलकरंजी, कुरुंदवाड, कागल, गारगोटी, मलकापूर, संभाजीनगर आणि गगनबावडा आगारातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर २ दिवसांपूर्वी राधानगरी, गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा आगारातील १५ कर्मचाऱ्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.