Entertainment : मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वीच तिची धाकटी बहीण गौतमी देशपांडे हीचा विवाह सोहळा संपन्न झाला. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर आता सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मृण्मयीने तिच्या शेतातील एक व्हिडिओ इनस्टाग्रामवर शेअर केला आहे.
काही महिन्यांपूर्वी निसर्गाच्या सानिध्यात तिने महाबळेश्वर येथे घर बांधलं. याबबतची माहिती तिने चाहत्यांना दिली होती. महाबळेश्वरमध्ये मृण्मयी आणि तिचा पती स्वप्नीलने ‘नील अँड मोमो’ फार्म्स हा नवा व्यवसाय सुरू केला आहे. आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात तिने वांगी, भेंडी. मिरची, कोथिंबीर सारख्या भाज्यांची लागवड केली आहे. आता मृण्मयीने तिच्या शेतात स्ट्रॉबेरी पिकवली आहे. नुकताच याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत मृण्मयी आणि तिचा नवरा शेतात पिकवलेल्या स्ट्रॉबेरी काढताना दिसत आहेत. यावेळी ती खूप उत्साही असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, मुंबईपासून आणि गर्दीपासून दूर राहून ती निसर्गाच्या सानिध्यात कुटुंबियांसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसते. मृण्मयी शेती व्यवसायात पुढे प्रगती करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. मृण्मयीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘नटसम्राट’, ‘फत्तेशिकस्त’, ‘सुभेदार’, ‘चंद्रमुखी’ यासारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. इतकेच काय तर ती छोट्या पडद्यावरील काही कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करतानाही दिसते.