मुंबई – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ‘जॅकलिन फर्नांडिस’ची आई ‘किम’ यांना हृदय विकाराचा झटका आला असून, त्यांना तातडीने बहरीन येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या किम यांच्यावर डॉक्टारांची एक स्पेशल टीम उपचार करत आहे.
जॅकलिनचे सर्व मित्र-मैत्रीणी श्रीलंकेत राहतात तर तिचे कुटुंबीय बहरीनमध्ये राहत असून, ती एकटी मुंबईत राहत आहे. दरम्यान, जॅकलिन लवकरात लवकर आपल्या आईला भेटण्यासाठी बहरीनला जाणार असल्याचे म्हंटलं जात आहे. जॅकलिनचा परिवार मोठा असून, तिला चुलत बहीण-भाऊ आणि काका देखील आहेत.
अभिनेत्री ‘जॅकलिन फर्नांडिस’ हिने अतिशय कमी कालावधीतच बॉलिवूडमध्ये आपले चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. “चिट्टीयां कल्लाईयां वे…’ या गाण्यामुळे जॅकलिन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. सोशल मीडियावर सुद्धा तिचे असंख्य फॅन्स आहेत.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास जॅकलिन लवकरच अभिनेता अक्षय कुमार सोबत ‘राम सेतू’ सिनेमात झळकणार आहे. तसेच ती ‘बच्चन पांडे’ आणि ‘सर्कस’ या सारख्या अन्य सिनेमांत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. सर्कस या सिनेमात जॅकलिन व्यतिरिक्त अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन देखील असणार आहेत.