पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रविवारी (दि. 4) ‘महाव्हॅकिसेनेशन ड्रायव्ह’ घेण्यात आला. त्यामध्ये दिवसभरात 19 हजार 439 जणांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये दिवसभरात महापालिकेचे 69 लसीकरण केंद्रावर लस देण्यात आली. त्या केंद्रावर 14 हजार 329 जणांना लस देण्यात आली. तर खासगी 19 केंद्रावर 5 हजार 110 जणांना लस देण्यात आली. आज 45 वर्षांवरील 8 हजार 70 तर 275 हेल्थ केअर व फ्रंट वर्कर यांना लस देण्यात आली. तसेच 18 ते 45 वर्ष वयोगटातील सर्वाधिक 11 हजार 94 नागरिकांना लस देण्यात आली. ‘महाव्हॅक्सिन ड्रायव्ह’च्या निमित्ताने शहरात 19 हजार 439 जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत महापालिकेच्या वतीने 7 लाख 2 हजार 966 जणांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.