पुणे: गेले दहा दिवसांपासून दक्षिण अंदमानात रखडलेल्या मान्सूनने आज थोडी वाटचाल करत अंदमान बेटांचा भाग व्यापत पोर्टब्लेअर पर्यत मजल मारली. अशा प्रकारे पोषक वातावरण राहीले तर येत्या चोवीस तासात मान्सून दक्षिण अरबी समुद्रातील मालदिव व कोमोरिन भागात दाखल होईल
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळामुळे रविवारी मान्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता.त्यानंतर मात्र मान्सूनची प्रगती झाली नव्हती. वादळामुळे मान्सूनचे प्रवाह प्रभावित झाल्याने तसेच समुद्रावरील बाष्प ओढून या भागात मुख्यत; कोरडे हवामान झाल्याने मान्सून पुढे सरकत नव्हता पण गेल्या दोन दिवसांपासून बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात मान्सूनसाठी पोषक स्थिती तयार होत आहे.
आज(बुधवारी) मान्सून पोटब्लेअर पर्यत दाखल झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. यापुढील मान्सूनचा प्रवास हा अरबी समुद्रातून होणार आहे. शुक्रवार पर्यत तो अरबी समुद्रात दाखल होईल त्यानंतर पुढील वाटचालीबाबत अंदाज व्यक्त करता येऊ शकतील. यंदा मान्सून केरळात चार दिवस उशीरा म्हणजे पाच जून दरम्यान पोहचण्याचा अंदाज आहे त्यामुळे आता प्रतिक्षा केरळात दाखल होण्याची आहे.