मुंबई – अभिनेत्री मोनालिसा आपल्या अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओजमुळे नेहमी चर्चेत असते. तिचे चाहते देखील तिची सतत स्तुती करत असतात आणि तिला विविध पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी प्रेरणा देत असतात. भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये मोनालीसाचा मोठा चाहता वर्ग आहे.
मोनालिसाने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यांना तिच्या चाहत्यांनी खूप पसंत केले आहे.भोजपुरी अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे. मोनालिसाच्या या अफलातून स्टाईलने तिच्या चाहत्यांची मने घायाळ केली आहेत.फोटोंमध्ये मोनालिसाने जांभळ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट आणि ओपन शर्टसह ब्रॅलेट घातला आहे. त्यासोबतच मोनालिसाने पांढऱ्या रंगाचे शूज घालून तिचा लूक आणखी अप्रतिम केला आहे.
View this post on Instagram
मोनालिसाने तिचे केस खुले आहेत आणि तिचा मेकअप नसलेला लुक चाहत्यांना अक्षरशः वेड लावत आहे. मोनालिसाचे चाहते या फोटोंवर तिचे कौतुक करताना थकत नाहीत. चाहत्यांनी या फोटोंवर कमेंटचा जोरदार पाऊस पाडला आहे.