शिक्रापूर -कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे एकवीस वर्षीय युवतीच्या घरात घुसून काही कारण नसताना पाच युवकांनी दारूच्या नशेत येऊन युवतीचा विनयभंग केला.
तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये स्वप्निल अनिल गव्हाणे, शुभम उत्तेकर (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) यांसह तीन अनोळखी युवकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पीडित युवती व तिची आई घरासमोर कपडे धुऊन घरामध्ये बसलेले होते. अचानक स्वप्निल गव्हाणे, शुभम उत्तेकर व काही युवकांनी कारमधून उतरून युवतीच्या घरामध्ये प्रवेश केला.
तिच्याशी झटापट करून विनयभंग केला. त्यानंतर युवतीच्या भावास जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात करीत आहेत.