वॉशिंग्टन – नव्याने सापडलेल्या ओमिक्रोन विषाणूवर मॉडर्ना कंपनीची करोना विरोधी लस कमी परिणामकारक असल्याचे कंपनीच्याच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. विषाणूच्या पूर्वीच्या स्ट्रेनवर ही लस जितकी परिणामकारक होती, तितकी ओमिक्रोनवर असणार नाही, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी स्टीफन बान्सेल यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.
ही लस म्हणजे केवळ एक औपचारिकता असेल. जोपर्यंत या नव्या विषाणूबाबतचा डाटा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत त्याबद्दल काहीही ठामपणे सांगता येऊ सकणार नाही, असे बान्सेल यांनी म्हटले आहे. ही लस नक्की परिणामकारक ठरणार नाही, असे यासंदर्भात कार्यरत असलेल्या बहुतेक शास्त्रज्ञांनी म्हटले असल्याचे ते म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या या दाव्यामुळे शेअर बाजार निर्देशांक 200 अंकांनी घसरला आहे. सध्या तयार केलेल्या लसीमध्ये पुढच्यावर्षी अधिक सुधारणा करावी लागेल, असे भाकितही बान्सेल यांनी वर्तवले आहे.