मुंबई – माय-भगिनींच्या रक्तबंबाळ शिरावर भळभळणारी जखम महाराष्ट्राच्या समाजमनावर आता खोलवर रुतली आहे. ही संतापजनक घटना आहे. असं ट्विटसह व्हिडिओ शेअर करत मनसेने संताप व्यक्त केला आहे.
जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यभरात या घटनेचे पडसात उमटत आहे. अशात विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. यावर आता मनसे सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला आहे.
व्हिडिओमध्ये हे हिंदवी राज्य आहे, इथं आया-बायांची पुजा केली जाते. आंदोलकांना पांगवायचं असेल, तर त्यांच्या कमरेच्या खाली पायावर लाठीने मारायचं असतं, हा पोलिसांचा नियम आहे. मात्र, जालन्यात पोलिसांनी आंदोलकांच्या थेट डोक्यावर मारल्याचं दिसत आहे.” असेही या व्हिडिओच्या मध्यमांतून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व्हिडीओ ट्वीट
माय-भगिनीच्या रक्तबंबाळ शिरावर भळभळणारी जखम महाराष्ट्राच्या समाजमनावर आता खोलवर रुतली आहे ! #संतापजनक pic.twitter.com/4ezcZN1UMS
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 2, 2023