Ravindra Dhangekar । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष मैदानात उतरला असल्याचे दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर इतर पक्षाचे नेते ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत पक्ष सोडून भाजप , शिंदे गट , अजित पवार गटात सामील होत आहे. तर विरोधी पक्षातील नेत्यांकडून लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचार करायला सुरुवात झाली आहे.
अशात पुणे लोकसभा मतदार संघ नेहमीच चर्चेत असतो. यंदा या मतदार संघातून कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष आहे, यावेळी या मतदार संघातून भाजपकडून जगदीश मुळीक, मुरलीधर मोहोळ,सुनील देवधर यांचा नावाची चर्चा आहे तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे, मोहन जोशी, रविंद्र धंगेकर यांचा नावाची चर्चां राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशात निवडणुक ही काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच होण्याची शक्यता आहे. पुण्यातून भाजपकडून देवेंद्र फडणवीस लढण्याची शक्यता आहे, अशी राजकीय वर्तुळात जोरात चर्चा सुरू आहे.
या चर्चांवर आता माध्यमांशी बोलतांना कसबा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पुणे लोकसभा निवडणुक देवेंद्र फडणवीस लढविणार अशी चर्चा सुरू आहे.तर तुम्ही निवडणुक लढविणार का ? रविंद्र धंगेकर म्हणाले “मी ३० वर्षापासुन राजकीय जीवनात आहे. या संपूर्ण कालावधीत कसबा विधानसभा मतदारसंघात विविध प्रभागातून नगरसेवक म्हणून पुणे महापालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या प्रत्येक निवडणुकीत समाजातील सर्व घटकांनी संधी दिल्याने नगरसेवक म्हणून काम करता आले. त्याच दरम्यान मागील वर्षी झालेली कसबा विधानसभा पोटनिवडणुक सर्व सामान्य नागरिकांनी हातामध्ये घेतल्याने मी आमदार झालो आहे.’
ते पुढे म्हणाले,’पुण्यातून देवेंद्र फडणवीस यांनी लढवावी किंवा त्यांच्या वरीष्ठ नेत्यांनी ही निवडणुक लढवावी, ही निवडणूक मीच जिंकणार अशी भूमिका मांडत भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.’
हेही वाचा
अजित पवार यांच्या अनुपस्थितीत महायुतीत जागावाटपाचा नवा फॉर्म्युला ठरला ?