अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरी

पुणे – प्रेमाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश एम.एम.देशपांडे यांनी सुनावली. दंड न भरल्यास त्याला अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागेल. दंडाची रक्कम पीडितेला नुकसानभरपाई स्वरूपात देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

ओंकार दत्तात्रय दांगट (वय 23, रा. कोथरूड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित सोळा वर्षीय मुलीच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेची साक्ष, जन्मलेल्या बाळाची केलेली डीएनए चाचणी महत्त्वाची ठरली. पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील यांनी या प्रकरणाचा तपास केला.

त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी सहायक पोलीस फौजदार कमलाकर गायकवाड, कॉन्स्टेबल संतोष धादवड, कॉन्स्टेबल माया जमदाडे यांनी मदत केली. ही घटना ऑक्‍टोबर 2014 ते फेब्रुवारी 2015 या कालावधीत घडली. प्रेमाच्या अमिषाने दांगट याने पीडितेशी शरीर संबंध निर्माण केले होते. त्यातून गर्भवती राहुन तिने बाळाला जन्म दिला आहे.

या प्रकरणात चतृश्रृंग़ी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यावर युक्तीवाद करताना हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍड. सप्रे यांनी केली

Leave A Reply

Your email address will not be published.