पिंपरी – पुण्यातील गणेशोत्सव आणि देखावे पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच देश-विदेशातून भाविक येतात. त्यांच्या सोयीसाठी मेट्रोने आपली सेवा वाढविली असून भाविकांनी मेट्रो सेवेला पसंती दिली. शनिवारी पिंपरी चिंचवडमधून 69 हजार 248 प्रवाशांनी तर, रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी करत 1 लाख 35 हजार 502 प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करत बाप्पांचे दर्शन घेतले.
शिवाजीनगरला उतरून पुढे पायी देखावे पाहणे, गणेशाचे दर्शन घेत फिरतात. त्यामुळे पुण्यातील रस्त्यांवर कायम वर्दळ असते. त्यातच मेट्रोनेही गणेश भक्तांसाठी दि. 27 सप्टेंबरपर्यंत सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सेवा सुरू ठेवली आहे. तर, दि. 28 सप्टेंबर विसर्जनाच्या दिवशी सकाळी 6 ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ही सेवा भाविकांसाठी सुरू राहणार आहे.