वॉशिंग्टन – भारतातील संस्कृतीसाठी कर्ज काढून मुलांचे लग्न समारंभ करणे जरी वेगळी गोष्ट नसली तरी अशाच प्रकारची परिस्थिती आता अमेरिकेतही उद्भवली आहे लग्नसमारंभ विधी आणि इतर सर्व अनुषंगिक प्रकार यांना महागाईचा फटका बसला असून लग्नाळू मुलांना आणि मुलींना आता कर्ज काढून आणि मासिक हप्ते भरून आपले लग्न विधी पार पडावे लागत आहेत या प्रकारे मासिक हप्ते भरून लग्नाचा खर्च देणाऱ्या काही कंपन्यांची स्थापनाही अमेरिकेत करण्यात आली असून वधू आणि वराच्या मेकअपपासून त्यांचे लग्नसमारंभातील पेहराव आणि इतर सर्व खर्चाचा भार या कंपन्या उचलत असून त्या बदल्यात त्यांच्याकडून व्याजासकट मासिक हप्ते वसूल करत आहेत.
एखाद्या लग्नसमारंभासाठी जो खर्च केला जातो त्या सर्व खर्चाचा भार उचलण्याचे काम या कंपन्या करत आहेत अमेरिकेतील आर्थिक व्यवस्थेतील या नव्या प्रक्रियेला वेडिंग क्रेडिट ऑफर असे म्हटले जात आहे लग्नसमारंभासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा पुरवठा करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना कंपनीने एकत्रित करून या कंपनीने त्यांच्याशी करार करून ही पद्धती सुरू केली आहे.
अमेरिकेच्या वेडिंग प्लॅनिंग अँड रजिस्टर या वेबसाईटवरील माहितीप्रमाणे गेल्या काही महिन्यांमध्ये जी 15000 लग्न झाली त्यामध्ये सरासरी एका लग्नावर 22 लाख रुपये खर्च करण्यात आला होता सर्वसामान्य नोकरदार आणि छोट्या व्यावसायिकांना लग्नसमारंभासाठी एवढा खर्च करणे परवडत नाही या व्यतिरिक्त घराचे हप्ते आणि इतर अनेक गोष्टींवर खर्च करावा लागत असल्याने या महागाईचा मोठा फटका अनेक तरुणांना बसत होता पण आता या नव्या कंपन्यांच्या अशा प्रकारच्या ऑफरमुळे अनेक तरुणांनी ईएमआयवर लग्न करण्याचा पर्याय स्वीकारला आहे.
सर्वसाधारणपणे विवाह समारंभासारखा एखादा विषय समोर येतो तेव्हा बँका त्या कारणासाठी कर्ज देण्याचे नाकारतात पण संबंधित लोकांना पर्सनल लोनच्या नावाखाली अशा प्रकारचे कर्ज दिले जाऊ शकते पण त्याचा व्याजदर जास्त असतो आता अमेरिकेतील तरुणांना हा लग्नासाठी कर्ज घेण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे अमेरिकेतील आर्थिक तज्ञांनी मात्र अशाप्रकारे कर्ज देणाऱ्या संस्थांकडून सावध राहावे असा इशाराही दिला आहे