नवी दिल्ली – कान्स चित्रपट महोत्सव हा जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक मानला जातो. यंदा 75 वा ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ 17 मेपासून सुरू होत आहे. या महोत्सवात भारत आपली उपस्थिती दर्शविली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने महोत्सवात प्रदर्शित होणाऱ्या भारतीय चित्रपटांची यादी जाहीर केली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (PIB) त्यांच्या ट्विटर अकाउंटवर चित्रपट शेअर केले आहेत. या यादीत आर माधवनचा रॉकेट्री – द नंबी इफेक्टचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत तमिळ, हिंदी, मल्याळम, मराठी आणि मिसिंग भाषांमध्ये चित्रपटांचा सुद्धा समावेश आहे. ‘रॉकेटरी’ व्यतिरिक्त ‘गोदावरी’ (मराठी), ‘बुंबा राइड’ (मिशिंग), ‘ट्री फुल ऑफ पोपट’ (मल्याळम), ‘धुइन’ (हिंदी, मराठी) आणि ‘अल्फा बेटा गामा’ (हिंदी) आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, कान्स चित्रपट महोत्सवामध्ये आता मराठी चित्रपट मानाचं स्थान मिळवलं आहे. जितेंद्र यांचा निर्मित गोदावरी चित्रपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये स्थान मिळवलं आहे. जितेंद्रने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘गोदावरी’चं पोस्टर शेअर करत ही आनंदाची बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली.
View this post on Instagram
जितेंद्रने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘गोदावरी’चं पोस्टर शेअर करत लिहिले आहे की,’आपण जे पेरतो तेच उगवतं, हा निसर्गाचा नियम आहे. तेच या चित्रपटाच्या बाबतीत घडतंय. आम्ही एक चांगला सिनेमा तयार केलाय. मी, निखिल आणि सगळेच एका चांगल्या हेतूने एकत्र आलो आणि त्याचं फळ आता मिळू लागलंय. चित्रपट महोत्सवात गाजतोय आणि प्रेक्षकांना आवडतोय, एका कलाकाराला यापेक्षा जास्त अजून काय हवं असतं.’ असंही त्याने लिहिले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, गोदावरीकाठच्या शहरात राहणाऱ्या निशिकांत देशमुख या तरुणाची आणि त्याच्या कुटुंबाची कथा ‘गोदावरी’मध्ये मांडण्यात आलीय. यात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे, विक्रम गोखले, प्रियदर्शन जाधव, सखी गोखले हे कलाकार आहेत. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होतोय याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागल आहे.