गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यात गुरुवारी (16 डिसेंबर) सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील केमिकल फॅक्टरीत मोठा स्फोट झाला आहे. ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर 15 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचमहाल जिल्ह्यात गुजरात फ्लोरो केमिकल फॅक्टरी असून, त्यामध्ये गुरुवारी सकाळी मोठा स्फोट झाला. पंचमहाल पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली यामध्ये ते म्हणाले, या प्रकरणाची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. स्फोटाचा आवाज इतका जोरदार होता की तो अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. सध्या तरी या अपघाताचे कारण समोर आलेले नाही.