Manoj Jarange Patil : मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी ते मुंबई असा पायी मोर्चा काढला आहे. आज चंदन नगर (खराडी बायपास) पुणे येथे हा मोर्चा निघणार आहे. उद्या म्हणजे 24 जानेवारीला (बुधवारी) हा मोर्चा पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पोहोचणार आहे. मात्र, या आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांनी जरांगे पाटील यांना आरामकरण्यासाठी आलीशान व्हॅनिटी व्हॅन दिमतीला दिली आहे.
या व्हॅनिटी व्हॅनमध्ये सोफा, बाथरुम, फ्रिज, ओव्हनपासून सर्व सुखसोयी आहेत. परंतू मनोज जरांगे पाटील यांनी अजूनही या व्हॅनमध्ये पाऊल ठेवलेले नाही. ते कार्यकर्त्यांसोबत रात्रीचा मुक्काम करीत असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या मोर्चा सोबत हा व्हॅन देखील सोबत असते पण जरांगे पाटील यामध्ये आराम करत नाहीत.
दरम्यान, मनोज जरांगे यांची अचानक तब्येत बिघडत असल्याने ही व्हॅनिटी व्हॅन सज्ज ठेवण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये दोन कंपार्टमेंट आहेत. त्यात ते आराम करू शकतात. व्हॅनिटीत फ्रिज आहे. अन्न गरम करण्यासाठी ओव्हन आहे. सोफा आहे. चार्जिंगची व्यवस्था आहे. अंघोळीसाठी बाथरूमही आहे. तसेच मोठा टीव्हीही आहे. ही संपूर्ण व्हॅन वातानुकुलित आहे. अश्या अनेक सुखसोयी या व्हॅनमध्ये देण्यात आल्या आहेत.