श्वेता तिवारीची मुलगी “रोजी ‘ द सैफ्रॉन चॅप्टर’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. गतवर्षी जुलैमध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. यात अभिनेता विवेक ओबेरॉय हा मुख्य भूमिका साकारत आहे. आता या चित्रपटात आणखी दोन आघाडीचे कलाकार झळकणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि अभिनेता अरबाज खान यांनाही कास्ट करण्यात आले आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असलेला हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटातून श्वेताची मुलगी पलक चित्रपटसृष्टीत पाउल ठेवत आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील महिन्यात सुरू करण्यात येणार आहे.
View this post on Instagram
यात मल्लिका शेरावत ही हटके भूमिका साकारताना दिसणार आहे. यापूर्वी कधीही न साकारलेल्या अशा भूमिकेत ती चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. यातील तिचा लुक हा वेगळाच असणार आहे. परंतु याबाबत अद्याप सस्पेंस कायम ठेवण्यात आला आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास मल्लिका अखेरच्या वेळी 2019मध्ये “बू सबकी फटेगी’ या वेब सीरीजमध्ये झळकली होती.
View this post on Instagram
तसेच अरबाज खानसह “दबंग-3’मध्येही तिने निर्णायक भूमिका साकारली होती. दुसरीकडे विवेक ऍबेरॉय हा “इति’ चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल करणार आहे.