कोल्हापूर – महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे आज कोल्हापुरात निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. अरुण मणिलाल गांधी हे महात्मा गांधींचे दुसरे पुत्र मणिलाल गांधी यांचे पुत्र होते. कोल्हापुरातील अवनि (अन्न वस्त्र निवारा ) संस्थेच्या बालगृहात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते एक लेखक आणि सामाजिक-राजकीय कार्यकर्ते होते.
अरुण मणिलाल गांधी यांचा जन्म 14 एप्रिल 1934 रोजी दक्षिण आफ्रिकेत झाला. त्यांचे वडील इंडियन ओपिनियन या वृत्तपत्राचे संपादक होते, तर आई त्याच वृत्तपत्रात प्रकाशक होती. अरुण गांधी यांनी त्यांच्या आजोबांचा मार्गाचा अवलंब करत सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर कार्यकर्ते म्हणून काम केले.
Bereaved. Lost my father this morning🙏🏽
— Tushar बेदखल (@TusharG) May 2, 2023
अरुण गांधी यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. अरुण गांधी 1987 मध्ये कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले. येथे त्यांनी ख्रिश्चन ब्रदर्स विद्यापीठात अहिंसेशी संबंधित एक संस्थाही स्थापन केली. त्यानंतर अरुण गांधी गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापुरात वास्तव्य होते. मात्र अल्पशा आजाराने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज कोल्हापुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी पीटीआयला दिली.