पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व भाजपचे खासदार ब्रीजभूषण सिंह यांनी केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली, त्यामुळे यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अखेर पुण्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यातच महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी वादावर पडदा टाकत आपल्या पदाचा राजीनामाही दिला.
BCCI | आयपीएलवर ताशेरे ओढणारा खेळाडूच होणार आता बीसीसीआय निवड समितीचा अध्यक्ष!
गेल्या काही महिन्यांपासून परिषदेतील अनेक वाद चव्हाट्यावर आले होते. लांडगे यांच्या राजीनाम्यानंतर आता रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवीन कार्यकारिणी परिषदेचे काम पाहाणार आहे. खरी कुस्तीगीर परिषद कोणाची यावरून सुरु असलेला वाद आता संपूष्टात आला आहे. या वादाची अखेर करताना शरद पवार यांनी परिषदेच्या अध्यक्षपदाचा तर लांडगे यांनी सचिव पदाचा राजीनामा भारतीय कुस्ती महासंघाकडे दिला आहे.
राजीनामा दिला असला तरीही तसेच शरद पवार यांना मुख्य आश्रयदाते म्हणून कुस्तीगीर परिषदेमध्ये मान देण्यात आला आहे. तसेच लांडगे यांनाही परिषदेत सामावून घेण्यात आले आहे. आता हे वाद संपल्यामुळे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहळ यांच्याच आयोजनाखाली ही स्पर्धा येत्या 11 ते 15 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.