T20 World Cup 2024 : आयर्लंडच्याआधी 1 जूनला बांगलादेशशी भिडणार भारत..! जाणून घ्या, इतर संघांच्या सराव सामन्यांचे वेळापत्रक

T20 World Cup 2024 : टी- 20 विश्वचषक 2024 हा 1 जूनपासून सुरू होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी काही संघ सराव सामने खेळणार आहेत. अमेरिका, त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये 27 मे ते 1 जून या कालावधीत सराव सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ 1 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये बांगलादेशविरुद्ध आपला एकमेव सराव सामना खेळणार आहे. मुख्य सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया नझमुल हसन शांतोच्या संघाविरुद्ध न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळताना दिसणार आहे.
पाकिस्तान एकही सराव सामना खेळणार नाही
पाकिस्तान संघ 6 जून रोजी अमेरिकेविरुद्धच्या सामन्याने टी-20 विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर बाबर आझमचा संघ 9 जूनला भारताशी भिडणार आहे. पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत कोणताही सराव सामना खेळणार नाही. सध्या पाकिस्तानचा संघ इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांची टी-20 मालिका खेळताना दिसत आहे. याआधी बाबरच्या सेनेने आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली होती.
31 मे रोजी वेस्ट इंडिजचा सामना ऑस्ट्रेलियाशी….
पाकिस्तानशिवाय दक्षिण आफ्रिकाही सराव सामना खेळणार नाही. अलीकडेच त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिका खेळली. वेस्ट इंडिजचा संघ 31 मे रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. त्याचबरोबर राशिद खानच्या अफगाणिस्तानचा सामना स्कॉटलंड आणि ओमानशी होणार आहे.
आतापर्यत झालेले सराव सामन्याचे निकाल…
स्पर्धेत 27 मे झालेल्या सराव सामन्यात नेपाळ विरूध्द कॅनडाचा संघ विजयी ठरला तर 28 मे रोजीच्या सराव सामन्यात पापुआ न्यू गिनीविरूध्द ओमान , युगांडा विरूध्द नामिबिया आणि श्रीलंके विरूध्द नेदरलॅण्ड्सचा संघ विजयी झाला. बांगलादेश आणि अमेरिका नुकतेच तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आमनेसामने आले होते. त्यानंतर स्पर्धेत होणारा बांगलादेश विरूध्द यूसए हा सराव सामना पावसामुळे रद्द झाला तर 29 मे रोजीच्या सराव सामन्यात नामेबिया विरूध्द आॅस्ट्रेलियाचा संघ विजयी झाला.
सराव सामना कुठे बघायला मिळणार?
टी 20 विश्वचषक 2024 च्या सराव सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. त्याच वेळी, या सामन्यांचे थेट प्रक्षेपण हे डिस्ने प्लस हॉटस्टारवर असेल. विशेष म्हणजे वेस्ट इंडिज-ऑस्ट्रेलिया आणि भारत-बांगलादेश या दोनच सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
टी-20 विश्वचषक 2024 च्या सराव सामन्यांचे वेळापत्रक
30 मे , गुरूवार
1. स्कॉटलंड विरूध्द युगांडा (रात्री 8 वाजता)
2. नेपाळ विरुद्ध अमेरिका (रात्री 9 वाजता)
31 मे, शुक्रवार
नामिबिया विरूध्द पापुआ न्यू गिनी (पहाटे 12:30 वाजता)
नेदरलँड विरुद्ध कॅनडा (पहाटे 1 वाजता)
वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया (पहाटे 4:30 वाजता)
आयर्लंड विरुद्ध श्रीलंका (रात्री 8 वाजता)
स्कॉटलंड विरुद्ध अफगाणिस्तान (रात्री 8 वाजता)
1 जून, शनिवार
भारत विरूध्द बांगलादेश (रात्री 8 वाजता)





