नवी दिल्ली – एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये केंद्र सरकारने आज दुहेरी दिलासा दिला आहे. तीन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये 200 रुपयांची कपात केली होती. अशातच आज केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीतही कपात केली आहे.
एलपीजी सिलिंडरचे नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबर 2023 पासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती 158 रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत.
तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता एलपीजी ग्राहकांना नवी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरसाठी 1,522 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकात्यात 1636 रुपये, तर मुंबईत 1,482 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,695 रुपये किंमत झाली आहे.