“प्यार और मौत को उम्र नहीं होती”! पतीसोबत घटस्फोट घेऊन महिलेने केले सासऱ्यासोबत लग्न

न्यूयॉर्क : आयुष्य जगतेवेळी प्रत्येकाच्या वैवाहिक आयुष्यात चढ-उतार होताच असतात. काही जण त्या अडचणींचा सामना करतात तर काही जण हतबल होतात. मात्र त्या अडचणीतून मार्ग काढणारे खरे लढवय्ये म्हणवले जातात. मात्र काहींची गोष्टच जगावेगळी असते. अमेरिकेतील केंटुकीमध्ये राहणारी ३१ वर्षीय एरिका क्विग्गची गोष्टदेखील तशीच आहे. तिने आपल्या पतीला घटस्फोट देत दुसरं लग्न केले. थांबा गोष्ट इथेच नाही संपली एरिका क्विग्गने दुसरे लग्न केले खरे पण हे लग्न दुसऱ्या तिसऱ्या कुणासोबत नाही तर स्वत:च्या सासऱ्यासोबतच केले आहे. क्विग्गने पती जस्टिन टॉवेलसोबत घटस्फोट घेतल्यावर त्याच्या ६० वर्षीय सावत्र वडिलांसोबत लग्न करून सर्वांना धक्का दिला.

एका इंग्रजी वतमानपत्राने याविषयी माहिती दिली. एरिका क्विग्गने १९ वर्षाआधी स्थानिक कारखान्यात काम करणाऱ्या जस्टिनसोबत लग्न झाले होते. दोघांना एक मुलगाही आहे. पण दोघांत वाद होऊ लागल्याने २०११ पासून दोघांच्या संबंधात दरी निर्माण झाली. यादरम्यान एरिकाचे सावत्र सासरे जेफ क्विगलच्या जवळ आले. २०१७ मध्ये जेव्हा एरिका आणि जस्टिनचा घटस्फोट झाला तेव्हा सावत्र सासऱ्यांनीच क्विग्गला लग्नासाठी प्रपोज केले. आधी तर एरिकाने काही सांगितले नाही पण नंतर तिने होकार दिला.

दोघांच्या वयात २९ वर्षाचं अंतर आहे. तरी दोघे आनंदाने पती-पत्नी म्हणून जीवन जगत आहेत. लग्नाच्या एका वर्षातच क्विग्गने एका मुलाला जन्म दिला. आता दोन्ही मुले आपल्या आईसोबत राहतात. आपल्या निर्णयावर आनंद व्यक्ती करत महिला म्हणाली की, मी माझा पती जस्टिनची बहिणीच्या माध्यमातून जेफला ओळखत होते. कठिण काळात त्यांनी मला साथ दिली तर मला वाटलं आमची जोडी जमू शकते.

एरिका क्विग्ग म्हणाली की, जेफ मनाने तरूण आहे. उलट मी त्याच्यापेक्षा वयस्कर वाटते. एरिकाचा पहिला पती जस्टिन यानेही दुससे लग्न केले आहे. दोघांकडे मुलाची अर्धी अर्धी कस्टडी आहे. दोन्ही परिवार आजूबाजूलाच राहतात. जस्टिन म्हणाला की, आमच्यात आता सगळं काही ठीक आहे. आता आमच्यात काही राग किंवा वाद नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.