वाघोली- लोणीकंद येथील सुरभी तळ्यामध्ये मंगेश नागरे व प्रियंका नागरे या दाम्पत्याने केलेल्या आत्महत्येप्रकरणी दोघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश नागरे याचे वडील म्हसू नागरे व भाऊ गणेश नागरे यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघोली येथील दाम्पत्य मंगेश नागरे व प्रियंका नागरे हे घरगुती भांडणातून दि. 15 सप्टेंबर रोजी घरातून निघून गेले होते. दि. 18 सप्टेंबर रोजी दोघांचे मृतदेह लोणीकंद येथील सुरभी तलावामध्ये आढळले होते. त्यानंतर प्रियंका नागरे यांचे वडील बबन इप्पर यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात म्हसू व गणेश नागरे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दोघांनी प्रियंका यांच्याकडे फ्लॅट घेण्यासाठी पाच लाख रुपये आणण्याचा तगादा लावला असल्यामुळे दाम्पत्याने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.