Lok Sabha Elections 2024 । देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाली आहे. आज पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर मतदान होत आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, पहिल्या टप्प्यात 16.63 कोटीहून अधिक मतदार आहेत. यामध्ये 8.4 कोटी पुरुष आणि 8.23 कोटी महिला मतदार आहेत.
दरम्यान, आज जगातील सर्वात लहान महिला ज्योती आमगे यांनी महाराष्ट्रातील नागपुरात मतदान केले. नागपूरच्या ज्योती आमगे यांचा जन्म १६ डिसेंबर १९९३ रोजी नागपुरात झाला होता. ज्योतीची उंची फक्त 2 फूट म्हणजेच 63 सेंटीमीटर आहे. ती जगातील सर्वात लहान महिला म्हणून ओळखली जाते. ज्योती आमगे यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. तिला दोन वेळा विश्वविक्रमाचा बिल्लाही देण्यात आला आहे.
ज्योतीला ॲकॉन्ड्रोप्लासिया नावाचा आजार आहे. हाडांमध्ये होणारा आजार आहे. त्यामुळे त्यांची उंची वाढू शकली नाही. लहानपणी ज्योतीला तिच्या कमी उंचीमुळे खूप चिडवले जायचे, पण नंतर हीच कमजोरी त्यांची ताकद बनली ज्योती तिच्या कुटुंबासोबत नागपुरात राहते. कुटुंबात आई, वडील, भाऊ आणि वहिनी आहे. ज्योतीला लग्न करायचे नाही, तिला अविवाहित राहायचे आहे. एका मुलाखतीत ज्योतीने सांगितले होते की, ती सगळ्यांनाच आपला मित्र मानते. तिला मुक्त व्हायचे आहे.’
ज्योती सध्या अभिनय आणि मॉडेलिंग करत आहे. अमेरिकन हॉरर स्टोरी या शोमध्येही ती दिसली आहे. कोरोनामुळे तिच्या अनेक अभिनय प्रकल्पांना ग्रहण लागले. ज्योतीचे स्वतःचे YouTube चॅनल देखील आहे. ती अनेकदा चॅनलवर तिच्या आयुष्याशी संबंधित काही व्हिडिओ अपलोड करत असते.
ज्योती आमगेने बिग बॉसमध्ये वाहवा मिळविली. ज्योती बिग बॉसमध्ये पाहुणे म्हणून दाखल झाली होती आणि 10 दिवस घरात राहिली होती. ज्योतीने दहा दिवसांतच सर्व स्पर्धकांची मने जिंकली होती. सर्वजण ज्योतीशी प्रेमाने बोलताना दिसत होते.