नवी दिल्ली – नाताळ या सणाचे आकर्षण म्हणजे सांताक्लॉज. या सणामध्ये सर्वच ख्रिस्ती बांधव सांताक्लॉजची वाट पाहत असतात. चिमुरड्यांना तर सांताने आपल्याला येऊन नक्की भेटावे असं वारंवार वाटत असत. अशात सांताक्लॉज बनून आलेल्या व्यक्तीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गुजरातमधील वडोदऱ्यात ही घटना घडली आहे.
मक्कारपूर येथे एका कॉलनीत सांताक्लॉजचा पोशाख परिधान करून एक व्यक्ती चॉकलेट वाटप करण्यासाठी गेली होता. याच कॉलनीत त्याचे परिचित देखील राहत होते त्यांना देखील भेट या व्यक्तीला घ्यायची होती. तत्पूर्वी या व्यक्तीने कॉलनीत चॉकलेट वाटप करायला सुरुवात केली त्यानंतर काहींनी या चॉकलेट वाटपावर आक्षेप घेतला. त्यानंतर दोन गटांमध्ये वाद झाला असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी एका वृत्तपत्राला दिल्याचे समोर आले आहे
वादानंतर दोन्हही गट पोलीस ठाण्यात गेल्याचे देखील समजते. यानंतर ख्रिस्ती बांधवांनी पोलिसांत जाऊन सणासाठी सुरक्षा मागितल्याचे पोलिसांनी सांगितले.दोन्हही बाजूच्यांनी कोणाविरोधातही तक्रार न दिल्याचे देखील पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच दोन्हही बाजूच्या सामंजस्याने हा वाद मिटला असल्याचे देखील पोलिसांनी यावेळी स्पष्ट केले.