‘पती’धर्माप्रमाणेच ‘पार्टी’धर्म देखील निभवा – लखनौ काँग्रेस उमेदवाराचा सिन्हाना टोला

लखनौ मतदारसंघातून काँग्रेसतर्फे आचार्य प्रमोद कृष्णम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या शत्रुघ्न सिन्हा हे समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवकडणूक लढवणाऱ्या पत्नी पूनम सिन्हा यांच्या प्रचारसभेत सहभागी होणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र आज शत्रुघ्न सिन्हा यांनी पत्नी पूनम सिन्हा यांच्या प्रचारसभेमध्ये सहभागी होत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांनी लखनौ मतदारसंघामध्ये समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवकडणूक लढवणाऱ्या पत्नी पूनम सिन्हा यांच्या प्रचारसभेत उपस्थिती लावल्याने येथील काँग्रेस उमेदवार आचार्य प्रमोद कृष्णम हे नाराज दिसत असून ते याबाबत म्हणतात, “ज्या प्रमाणे शत्रुघ्न सिन्हा यांनी आज पत्नी पूनम सिन्हा यांच्या प्रचारसभेला उपस्थिती लावत ‘पती’धर्माचे पालन केले त्याचप्रमाणे त्यांनी माझ्या प्रचारसभेला देखील उपस्थिती लावून ‘पार्टी’धर्माचे देखील पालन करावे.

लखनौ लोकसभा मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होणार असल्याचे दिसत असून येथून भाजपतर्फे जेष्ठ नेते राजनाथ सिंह, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या आघाडीकडून पूनम सिन्हा तर काँग्रेसतर्फे आचार्य प्रमोद कृष्णम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पूनम सिन्हा यांना समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर समाजवादी पक्षातर्फे काँग्रेसला लखनौमधून उमेदवार देऊ नये अशी विनंती करण्यात आली होती मात्र काँग्रेसने उमेदवार दिल्याने शत्रुघ्न सिन्हा पक्ष की परिवार अशा संकटात सापडले होते. मात्र शत्रुघ्न सिन्हा यांनी परिवाराला प्रथम प्राधान्य देत आज आपली बाजू स्पष्ट केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.