Pele Health – ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना कर्करोगाच्या आजारामुळे साओ पाउलोच्या अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पेले यांचे वय ८२ वर्ष असून ते मागील काही महिन्यांपासून किडनी आणि हृदयविकाराच्या त्रासाशी लढत आहेत. पेले यांची प्रकृती सतत खालावत असल्याने त्यांचे कुटुंबीय रुग्णालयाबाहेर जमा झाले आहेत.
जयदेव उनाडकटसाठी पंतने केलेल्या ‘या’ कामाची सर्वत्र चर्चा; चाहत्यांकडून जोरदार कौतुक!
पेले यांना नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी या आठवड्याच्या सुरुवातीलाच पेले यांचा कर्करोग वाढला असल्याचे सांगितले आहे. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त रुग्णालयाकडून इतर कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, पेले यांचा मुलगा एडसन चोल्बी नॅसिमेंटो शनिवारी रुग्णालयात दाखल झाला होता. तेव्हा त्याने त्याच्या इंस्टाग्राम खात्यावर एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो आपल्या वडिलांचा हात हातात धरलेला दिसत आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, “बाबा… माझी ताकद तुमच्याकडून आहे.” त्याचबरोबर पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो हीदेखील रुग्णालयात वडिलांना पाहण्यासाठी आली होती. त्यावेळी केलीने तिच्या वडिलांना मिठी मारतानाच्या फोटोसह इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली आहे.
View this post on Instagram
सप्टेंबर २०२१ मध्ये पेले यांचा कोलन ट्यूमर (एक प्रकारचा कँसर) काढण्यात आला होता. त्यानंतर त्यांची केमोथेरपी करण्यात आली होती. पेले यांना यापूर्वीही अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात हळूहळू त्यांची प्रकृती ढासळू लागली आणि नोव्हेंबरच्या अखेरीस त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पेले यांनी 1958, 1962 आणि 1970 च्या फिफा विश्वचषकात ब्राझीलला विजेतेपद मिळवून दिलेले आहे.