कात्रज – कात्रज येथील स्व.राजीव गांधी प्राणीसंग्रहालय दोन वर्षानंतर अखेर पर्यटकांसाठी खुले झाले. रविवार दिनांक 20 मार्च रोजी हे प्राणी संग्रहालय सुरू झाल्याने पर्यटकांसह त्यांचे बच्चेकंपनी यांना यावेळी मोठा आनंद झाला असे यावेळी पर्यटकांशी बोलताना व बच्चेकंपनी शी बोलताना पहायला मिळाले.
प्राणी संग्रहालय प्रशासनाच्यावतीने पहिल्या दिवशी पर्यटकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्राणिसंग्रहालयाच्या अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांनी देखील यावेळी पर्यटकांचे स्वागत प्रवेश द्वारावर केले.
यावेळी राजीव गांधी प्राणि संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी सुचित्रा सूर्यवंशी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. प्राणी संग्रहालयामध्ये लेपर्ड कॅट शेकरू व जंगल कॅट ही नवीन प्राणी आकर्षण पर्यटकांसाठी ठरत आहेत