ई-कॉमर्स द्वारे भारतातून निर्यातीस मोठा वाव

नवी दिल्ली – भारतात आगामी काळात देशांतर्गत पातळीवर ई-कॉमर्स वेगाने वाढणार आहे. एवढेच नाही तर ई-कॉमर्सच्या माध्यमातून भारतातून होणारी निर्यात ही वाढणार असल्याचे ऍमेझॉन कंपनीने म्हटले आहे.

ऍमेझॉन इंडियाचे भारत प्रमुख अमित अगरवाल यांनी सांगितले की, ई- कॉमर्सच्या माध्यमातून भारतातून 2023 पर्यंत पाच अब्ज डॉलरची निर्यात होऊ शकेल.ऍमेझॉन कंपनीने चार वर्षांपूर्वीही ई-कॉमर्सच्या माध्यमातून निर्यात करायला सुरुवात केलेली आहे. भारतातील उत्पादने जागतिक दर्जाची होऊ लागली आहेत. निर्यात वाढवणे भारताच्या दृष्टिकोनातून गरजेचे आहे हे भारतातील कंपन्या, केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना कळून चुकले आहे. त्या दृष्टिकोनातून या सर्वांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे भारतातून निर्यात वाढणार आहे भारतातील छोट्या कंपन्या आणि लघु उद्योगही निर्यातीबाबत संवेदनाशील झाले असल्याचे दिसून येत आहे.

2015 मध्ये आमच्याकडे फक्‍त हाताच्या बोटावर मोजण्याएवढे निर्यातदार होते. आता या निर्यातदारांची संख्या पन्नास हजारांवर गेली असून या व्यासपीठावरून एक अब्ज डॉलरची निर्यात होऊ लागली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.