झील महाविद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न

पुणे : झील महाविद्यालयाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी हडपसर येथील प्रायमस टेक सिस्टीम कंपनीस भेट दिली. विद्यार्थ्यांना औद्योगिक जगतातील वैविध्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती करून देण्यासाठी साक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

या शैक्षणिक सहलीत 40 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. सदर शैक्षणिक सहलीमध्ये प्रायमस टेक सिस्टीम कंपनी कडून दिव्या मॅडम आणि देशपांडे सरानी मार्गदर्शन केले. यावेळी कंपनीमधील विविध प्रकल्पांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

या सहलीसाठी संस्थेचे सचिव प्रा. जयेशजी काटकर, संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. प्रदीप खांदवे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित काटे, माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. योगेश गुरव आदींनी शुभेच्छा दिल्या. सदर सहलीचे यशस्वी आयोजन प्रा. निहाल शिकलगार यांनी केले.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here