इंदापूर – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत बुधवारी (दि. 11) भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमवेत हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयावरती चर्चा केली. इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या भेटीत इंदापूर तालुक्यातील विविध विकास संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी हर्षवर्धन पाटील यांनी चर्चा केली. इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांसंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
या भेटीत देवेंद्र फ डणवीस यांचेबरोबर भाजप पक्ष संघटना बळकटीकरणा संदर्भातही हर्षवर्धन पाटील यांचा संवाद झाला. या दोन्ही भेटीप्रसंगी निहार ठाकरे, निरा भिमा साखर कारखान्याचे संचालक व इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे अध्यक्ष राजवर्धन पाटील उपस्थित होते.