दौंड विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत
दौंड- दौंड विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि. 4) महायुतीचे रासपचे आमदार ऍड. राहुल कुल व महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे माजी आमदार तथा जिल्हा बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात यांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडे आपले अर्ज दाखल केले.
कुल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रासपचे अध्यक्ष व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, पुण्याचे खासदार गिरीश बापट, माजी आमदार रंजना कुल, कांचन कुल, प्रेमसुख कटारिया, नंदू पवार,वासुदेव काळे, अनिल सोनवणे, उपस्थित होते. तर रमेश थोरात यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, जिल्हापरिषद सदस्य वीरधवल जगदाळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे, उपनगराध्यक्ष वासिम शेख, शहराध्यक्ष गुरुमुख नारंग, नगरसेवक बादशहा शेख, सुहेल खान, नाना साहेब फडके व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.