कोल्हापूर (प्रतिनिधी) – शहर पाणी पुरवठा विभागाकडील थकीत पाणीपट्टी वसुल करणेची मोहिमेअंतर्गत आज शहरातील विविध भागातील थकबाकीदारांवर कारवाई करुन थकीत रक्कम वसुल करण्यात आली. या कारवाईत तब्बल 9,47,869/-इतकी वसुल करण्यात आली.
थकीत पाणीपटटीची रक्कम वसुली करणेच्या अनुषंगाने शहर पाणी पुरवठा विभागाच्या वतीने 5 वसुली पथके तयार करण्यात आली आहे. यामध्ये फक्त महिलांचे एक पथक कार्यरत आहे. या पथकामार्फत वसुलीची कारवाई करण्यात येत आहे. तसेच रक्कम रु.10,000/- पेक्षा अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांना नोटीस पाठविण्यात आलेल्या आहेत.
सदरची कारवाई अतिरिकत आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता भास्कर कुंभार व पाणीपट्टी अधिक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. यावेळी पथक प्रमुख मोहन जाधव, पी. एस. माने, के. टी. पाटील, नरेंद्र प्रभावळकर व भागातील मिटर रिडर्स यांनी भाग घेतला.