बरेली – घराजवळच्या अंगणात खेळत असलेल्या एक वर्षांच्या मुलाने त्याच्याजवळ आलेल्या सापाच्या पिल्लालाच गिळले. ही गोष्ट आईच्या नजरेत पडल्याने तीने दाखवलेल्या प्रसंगावधानाने या मुलाचे प्राण वाचले.
घरात किंवा आंगणात खेळताना लहान मुले अनेकदा त्यांना दिसेल ती वस्तू तोंडात घालतात हे अनेकांना माहित असेल. येथिल एका गावात ही घटना घडली. हा मुलगा घराजवळच्या आंगणात खेळत असताना अचानक त्याला एक सापाचे पिल्लू दिसले. त्याने ते उचलून तोंडात घातले. मात्र, त्याचवेळी आईची नजर त्याच्यावर गेली व तीने लगेचच या मुलाच्या तोंडातून हे सापाचे पिल्लू बाहेर काढले. यामुळे या मुलाचे प्राण वाचले.
अर्थात त्यानंतर त्याच्या आईने आपल्या पतीसह या मुलाला रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी दाखल करुन घेतले. या मुलाची प्रकृती ठीक असून त्याच्या जीवाला कोणताही धोका होऊ नये यासाठी डॉक्टर त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. खबरदारीचा उपायम्हणून या मुलाला पुढील दोन दिवस रुग्णालयातच राहावे लागणार आहे.